मुख्यपृष्ठ महाराष्ट्र सरकारी योजना 2023 (लिस्ट) संपूर्ण माहिती मराठी

या योजनेमध्ये ज्या मातेने किंवा पित्याने एका मुलीच्या जन्मा नंतर लगेच एक वर्षाच्या आत परिवार नियोजन केले आहे, अशा कुटुंबातील मुलीच्या नावाने 50,000/-रुपये सरकार व्दारा बँक मध्ये जमा केले जाईल,  त्याचप्रमाणे या योजने मध्ये ज्या माता किंवा पित्याने
दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर लगेच परिवार नियोजन केले आहे, त्यांना परिवार नियोजन केल्यानंतर दोन्ही मुलींच्या नावाने शासनाकडून 25000/–25000/- रुपये बँकेमध्ये जमा केले जाईल. तसेच माझी कन्या भाग्यश्रीमुख्यपृष्ठ महाराष्ट्र सरकारी योजना  अंतर्गत महाराष्ट्रातील एका व्यक्तीच्या दोन मुलींनाच या योजनेचा लाभ मिळेल, या योजनेच्या अंतर्गत सुरवातील ज्या दारिद्र्य रेषेखालील (BPL) कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न एक लाख पर्यंत होते त्याच कुटुंबाना या योजनेचा लाभ देण्यात येत होता.
शासनाच्या नवीन निर्णयानुसार या योजनेच्या अंतर्गत मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नाची मर्यादा वाढऊन एक लाखावरून 7.5 लाख रुपये करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त मुलीचा जन्म झाल्यापासून मुलगी अठरा वर्षाची होईपर्यंत या योजने अंतर्गत अधिकचे लाभ देण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे.
या योजनेमध्ये ज्या मातेने किंवा पित्याने एका मुलीच्या जन्मा नंतर लगेच एक वर्षाच्या आत परिवार नियोजन केले आहे, अशा कुटुंबातील मुलीच्या नावाने 50,000/-रुपये सरकार व्दारा बँक मध्ये जमा केले जाईल,  त्याचप्रमाणे या योजने मध्ये ज्या माता किंवा पित्याने
दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर लगेच परिवार नियोजन केले आहे, त्यांना परिवार नियोजन केल्यानंतर दोन्ही मुलींच्या नावाने शासनाकडून 25000/–25000/- रुपये बँकेमध्ये जमा केले जाईल. तसेच माझी कन्या भाग्यश्रीमुख्यपृष्ठ महाराष्ट्र सरकारी योजना अंतर्गत महाराष्ट्रातील एका व्यक्तीच्या दोन मुलींनाच या योजनेचा
लाभ मिळेल, या योजनेच्या अंतर्गत सुरवातील ज्या दारिद्र्य रेषेखालील (BPL) कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न एक लाख पर्यंत होते त्याच कुटुंबाना या योजनेचा लाभ देण्यात येत होता.
शासनाच्या नवीन निर्णयानुसार या योजनेच्या अंतर्गत मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नाची मर्यादा वाढऊन एक लाखावरून 7.5 लाख रुपये करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त मुलीचा जन्म झाल्यापासून मुलगी अठरा वर्षाची होईपर्यंत या योजने अंतर्गत अधिकचे लाभ देण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे.

 

शिव भोजन योजना 2022 महाराष्ट्र

माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 सुधारित योजनेची कार्यपद्धती
माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनेंतर्गत, मुलीचा जन्म झाल्यावर या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र मुलीच्या पालकांनी सबंधित ग्रामीण किंवा नागरी क्षेत्रातील नगरपालिका, ग्रामपंचायत किंवा महानगरपालिका मध्ये जाऊन मुलीच्या जन्माची नोंद करावी.

मुलीच्या जन्माची नोंदणी झाल्यानंतर लाभार्थी पालकांनी त्या विभागातील अंगणवाडी सेविकाकडे प्रपत्र-अ किंवा प्रपत्र-ब मध्ये अर्ज सादर करावा आणि योजनेला आवश्यक असलेले सर्व कागदपत्र अर्जासोबत जोडावे तसेच अंगणवाडी सेविकेने लाभार्थी पालकांकडून अर्ज भरून ध्यावा आणि अर्ज भरण्यास मदत करावी.

या योजनेस आवश्यक असणारी सर्व अर्ज राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बाल विकास अधिकारी, महिला व बाल विकास अधिकारी, तसेच जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आणि विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयात विनामूल्य उपलब्ध असतील.

यानंतर अंगणवाडी सेविकेने योजनेचा अर्ज मुख्यसेविका यांच्याकडे सादर करावा आणि मुख्य सेविका यांनी योजनेच्या अर्जांची पूर्ण पडताळणी करून प्रत्येक महिन्याला नागरी व ग्रामीण बाल विकास प्रकल्प अधिकारी तेसेच अनाथ मुलींच्या बाबतीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी महिला व बाल विकास अधिकारी आणि जिल्हा परिषद, यांना एकत्रित यादी मान्यतेसाठी सादर करावी.

अनाथ मुलींच्या बाबतीत या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्ज सादर करण्याआधी सबंधित बाल कल्याण समिती यांचे मुलगी अनाथ असल्याचे प्रमाणपत्र सबंधित संस्थांनी प्राप्त करून घेऊन अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

अर्जदारांनी पूर्ण माहितीसह भरून दिलेले अर्ज कागदपत्रांसह वर नमूद केलेल्या सबंधित अधिकाऱ्यांनी मुलींच्या जन्मानंतर एका मुलीनंतर कटुंब नियोजन करणाऱ्या पालकांच्या बाबतीत एक वर्षाच्या आत आणि दोन मुलीवर कुटुंब नियोजन करणाऱ्या पालकांच्या बाबतीत सहा महिन्याच्या

आत कुटुंब नियोजन केल्याचा दाखला जोडून सादर केलेले अर्ज स्वीकारावे, त्याचप्रमाणे अर्ज संपूर्ण भरला नसल्यास अथवा सर्व प्रमाणपत्रांसह सादर केला नसल्यास, अर्ज मिळाल्यापासून पंधरा दिवसाच्या आत अर्जदारास लेखी कळविण्यात यावे आणि वरील मुदती व्यतिरिक्त आणखी एक महिन्याची वाढीव मुदत देण्यात यावी, परंतु यानंतर कोणत्याही परिस्थितीत अर्ज दोन महिन्यापेक्षा जास्त काळ प्रलंबित ठेवता येणार नाही.

प्रधानमंत्री जनधन योजना बँक बचत खाते

प्रधानमंत्री जनधन योजना, या योजने अंतर्गत लाभार्थी मुलगी आणि तिची माता याच्या नावाने संयुक्त बचत खाते बँक ऑफ महाराष्ट्र या राष्ट्रीयकृत बँकेत उघडण्यात येईल तसेच या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना एक लाख रुपये अपघात विमा आणि पाच हजार रुपये ओव्हरड्राफ्ट आणि इतर लाभ देण्यात येतात. माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत देण्यात येणारे लाभ लाभार्थ्यांच्या प्रधानमंत्री जनधन योजनेच्या अंतर्गत उघडलेल्या बँक बचत खात्यात देण्यात येईल. प्रधानमंत्री जनधन बचत खाते उघडण्यासाठी अर्जदारास अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका मदत करतील.

Maharashtra Construction Workers Registration माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 अर्ज करण्याची प्रक्रिया
महाराष्ट्र राज्यातील ज्या पात्र पालकांना माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट Official Website वर जाऊन माझी कन्या भाग्यश्री योजना चा एप्लिकेशन फॉर्म PDF [Application form PDF] डाऊनलोड करावा लागेल

, अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती जसे पालकाचे नाव, मुलीचे नाव, मोबाइल नंबर, मुलीचे जन्म प्रमाणपत्र इत्यादी संपूर्ण तपशीलवार माहिती भरून आणि अर्जाला सर्व आवश्यक कागदपत्र जोडून, अर्ज संबधित महिला व बाल विकास कार्यालयात जाऊन जमा करावा लागेल, अशा प्रकारे आपली माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 मध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

वाचकहो या लेखामध्ये आम्ही माझी कन्या भाग्यश्री योजनेबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तरीही आपल्याला आणखी या योजनेबद्दल माहिती जाणून घायची असल्यास आपण योजनेच्या सबंधित कार्यालयात जाऊन माहिती घेऊ शकता, माझी कन्या भाग्यश्री हि महाराष्ट्र सरकारची महत्वकांक्षी योजना आहे, राज्यातील नागरिकांनी मुलींच्या उज्वल भवितव्यासाठी या योजनेचा लाभ अवश्य घ्यावा. आणि या योजनेबद्दल जास्तीत जास्त पालकांना जागरूक करावे.

FAQ:-

Q. माझी कन्या भाग्यश्री योजना काय आहे ?

मुलींच्या संख्येमध्ये सुधार करणे, मुलींचे शिक्षण, आरोग्य यामध्ये सुधारणा करणे आणि त्यांच्या उज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे त्याचबरोबर त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे आणि मुलींना पुढील जीवनात स्वावलंबी बनविणे या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने हि योजना संपूर्ण राज्यात सुरु केली आहे.

Q. माझी कन्या भाग्यश्री योजना केव्हा सुरु झाली ?

महाराष्ट्र राज्यात सुरवातील सुकन्या योजना सुरु करण्यात आली होती त्या योजनेमध्ये संपूर्ण बदल करून अधिक लाभासहित माझी कन्या भाग्यश्री सुधारित हि योजना 1 ऑगस्ट 2017 पासुन सम्पूर्ण राज्यात राबविली जात आहे.

Q. माझी कन्या भाग्यश्री या योजनेमध्ये मिळणारी धनराशी मुलीला केव्हा मिळते ?

या योजनेंतर्गत ठराविक रक्कम मुलींच्या नावे बँकेमध्ये मुदत ठेवीमध्ये गुंतवली जाते आणि सुरवातीला मुलीच्या वयाच्या सहाव्या वर्षी त्यानंतर बाराव्या वर्षी गुंतविल्या रकमेवरचे फक्त व्याज आणि नंतर मुलगी अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर मुदत ठेवीची संपूर्ण रक्कम व्याजासह मुलीला देण्यात येते.

Q. माझी कन्या भाग्यश्री योजना 2022 योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र पालकांनी ऑनलाइन फॉर्म PDF डाऊनलोड करून किंवा योजनेच्या सबंधित कार्यालयात जाऊन योजनेचा अर्ज घेऊन आपल्या विभागातील अंगणवाडी सेविकेच्या मदतीने संपूर्ण अर्ज तपशीलवार भरून अर्जाला आवश्यक कागदपत्रे जोडून योजनेच्या सबंधित महिला व बाल विकास कार्यालयात जमा करावा.

Leave a Comment